आमच्याबद्दल | रयत ई-सुविधा केंद्र | शासकीय व खासगी डिजिटल सेवा
रयत ई-सुविधा केंद्र
डिजिटल सेवा
15+ वर्षांचा
अनुभव
एक विचार… जो हजारो गावांचा चेहरा बदलतोय!

फक्त ₹19,999 गुंतवून स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि दर महिन्याला ₹1,59,000 पर्यंत कमवा.

🌾 रयत ई-सुविधा केंद्र म्हणजे काय?

रयत ई-सुविधा केंद्र ही केवळ डिजिटल सेवा देणारे स्थळ नाही — तर ही एक चळवळ आहे, जी सामान्य माणसाला स्वतःचं स्थिर उत्पन्न आणि गावाला गरजेच्या सर्व सेवा देण्याची ताकद देते.

आपल्या गावातला प्रत्येक व्यक्ती मोबाईल वापरतो, पण अजूनही अनेकांना शासकीय सेवा व योजना, शैक्षणिक व इतर कागदपत्रे, विविध डिजिटल सेवा, नोकरीची संधी शोधण्यासाठी, विविध कला-कौशल्य शिकण्यासाठी, आर्थिक योजना किंवा डिजिटल प्रशिक्षणासाठी आणि अशा अनेक कामांसाठी तालुक्याला जावं लागतं.

आपल्या महाराष्ट्रात, भारतात आणि जगभरामध्ये अशा अनेक सेवा आणि संधी आहेत ज्यांचा लाभ माहिती नसल्याने तुम्हांला घेता येत नाही, हे सर्व चित्र बदलण्यासाठी, तुम्हांला डिजिटल युगातील सर्व संधींशी जोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

संपर्क करा
📞
सोमवार – शनिवार
10:00 AM – 7:00 PM
हेल्पलाईन
डिजिटल उद्योजक तयार करा – गावाचा विकास घडवा!

रयत ई-सुविधा केंद्र – तुमच्या यशाचा डिजिटल भागीदार.

🎯 आमचं ध्येय

  • महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक जबाबदार आणि सक्षम डिजिटल उद्योजक घडवणे, जो आपल्या परिसरातील नागरिकांना उपयुक्त सेवा देईल आणि स्वतःचं यश घडवेल.
  • सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनमान्य सेवा पोहोचवून, त्यांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ घरपोच मिळवून देणे.
  • महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील नागरिकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण, रोजगार, व्यवसाय व तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी मिळवून देण्यासाठी सक्षम करणे.
  • प्रत्येक डिजिटल उद्योजकाला तंत्रज्ञान, योग्य शिक्षण, स्थिर उत्पन्न आणि सामाजिक सन्मान मिळवून देऊन त्याला आत्मनिर्भर बनवणे.

👁 आमचा दृष्टिकोन

प्रत्येक गावात एक डिजिटल उद्योजक उभे करणे – जे आपल्या भागातील लोकांना आधुनिक सेवा, माहिती आणि उत्पन्नाचं दार उघडून देतील.

रयत ई-सुविधा केंद्र हे केवळ सेवा केंद्र नाही — ते एक परिवर्तनाचे साधन आहे. आम्ही विश्वास ठेवतो की जेव्हा एक गावातील तरुण किंवा महिला डिजिटल उद्योजक बनते, तेव्हा संपूर्ण गावाचे भवितव्य बदलते.

आमचा दृष्टिकोन आहे — "डिजिटल सेवा, स्थानिक भाषेत, विश्वासाने." प्रत्येक नागरिकाला त्यांच्या भाषेत, त्यांच्या गावात, सोप्या पद्धतीने सर्व सेवा मिळाव्यात हेच आमचं स्वप्न आहे.

📋 आमची उद्दिष्टं

  • कमी गुंतवणुकीत, जास्त उत्पन्न देणाऱ्या व्यवसायाच्या संधी ग्रामीण तरुणांसाठी उपलब्ध करून देणे.
  • बेरोजगार, महिला व तरुणांना डिजिटल युगासाठी तयार करून त्यांना स्वतःचं उत्पन्न आणि सामाजिक सन्मान मिळवून देणे.
  • डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गावोगावी सेवा पोहोचवून, प्रत्येक घरात 'सोप्या भाषेत, विश्वासार्ह' सुविधा उपलब्ध करून देणे.
  • सरकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवून, त्यांना सक्षम आणि माहितीपूर्ण बनवणे.
  • 2025 संपेपर्यंत महाराष्ट्रात 1000 रयत ई-सुविधा केंद्रे सुरू करून, हजार कुटुंबांना उत्पन्न, आणि लाखो लोकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचा आमचा ठाम संकल्प आहे.

💚 आमची मूल्यं

🌱 स्वावलंबन

प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं काम, स्वतःची ओळख, आणि सन्मानानं जगण्याची संधी मिळाली पाहिजे — हेच आमच्या संकल्पनेचं मुळं आहे.

✋ सहजता

सेवा देताना अडथळा नको – ना भाषेचा, ना प्रक्रियेचा. सगळं सोप्पं, स्पष्ट आणि लोकांना समजेल असंच असावं, हीच आमची भूमिका.

🤝 सततचा साथ

एकदा व्यवसाय सुरू केला की तो त्याच्या भरवशावर टाकून दिला जात नाही — आम्ही प्रत्येक टप्प्यावर त्या उद्योजकाच्या सोबत आहोत.

💛 संवेदनशीलता

आमच्यासाठी प्रत्येक सेवा ही एक फॉर्म नाही, ती कोणाच्यातरी गरज आहे. शेवटच्या माणसालाही समजून घेणं — हेच आमचं ध्येय आहे.

🏆 सामूहिक यश

ही वाटचाल 'मी' ची नाही – 'आपण' ची आहे. ज्या क्षणी एक उद्योजक कमावतो, त्याच क्षणी एक गाव डिजिटली सक्षम होते.

🔒 विश्वासार्हता

आमच्या प्रत्येक सेवेत पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा आहे. नागरिकांचा विश्वास हेच आमचं सर्वात मोठं भांडवल आहे.

🏛 संस्थेची स्थापना आणि हेतू

रयत ई-सुविधा केंद्र ही एक महत्त्वाकांक्षी डिजिटल उपक्रम आहे. "Digitally Empowering Rural Maharashtra" या उद्दिष्टाने, आमची टीम मागील 15+ वर्षांपासून ग्रामीण डिजिटल अभियान, शासकीय भागीदारी, स्टार्टअप इनोव्हेशन आणि रोजगार निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे.

रयत (Rayat) म्हणजे सामान्य जनता. आमचं हे नाव आमच्या ध्येयाचा प्रतिबिंब आहे — सामान्य माणसासाठी, सामान्य माणसाद्वारे, सामान्य माणसाला सशक्त करणे.

आमचे कर्जासाठी लोन पोर्टल आणि फ्रँचायझी नेटवर्क हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात डिजिटल क्रांती घडवण्याचे शक्तिशाली साधन आहे.

संस्थापक व प्रमुख टीमबद्दल

आमची टीम ही अनुभवी, समर्पित आणि यशस्वी महाराष्ट्र घडवण्यासाठी कटिबद्ध आहे.

👨‍💼

श्री संस्थापक – सेवा प्रमुख

सह-संस्थापक आणि सेवा व प्रशिक्षण प्रमुख

"मी अशा तरुणांसाठी काम करतोय, जे शिकलेले असतात… पण त्यांना कुठून, कसं, आणि काय सुरू करावं हेच कळत नाही. रयत ई-सुविधा केंद्र ही त्यांच्या सुरुवातीची दिशा आहे."

जमिनीवर काम करणाऱ्या माणसाला कोणती सेवा कशी समजेल, आणि त्यातून उत्पन्न कसं वाढेल, हे नेमकं ओळखण्याचं कसब यांच्याकडे आहे. रयत ई-सुविधा केंद्रातील प्रत्येक सेवा मॉडेल तयार करणं, वापरण्यास सोपं सॉफ्टवेअर डिझाइन करणं, आणि नवीन फ्रँचायझींना प्रशिक्षण देणं हे ते अत्यंत तळमळीने करतात.

👨‍🏫

श्री विस्तार प्रमुख

सह-संस्थापक आणि मुख्य ब्रँड व विस्तार प्रमुख

"मी अशा पिढीसाठी काम करतोय, ज्यांच्याकडे क्षमता आहे… पण संधी नाही! रयत ई-सुविधा केंद्र त्याचं उत्तर आहे – एक व्यवसाय, एक ओळख, एक सुरुवात भविष्यासाठी!"

संकल्पनेच्या मुळापासून ब्रँड उभा करण्यापर्यंत आणि गावोगाव पोहोचवण्यापर्यंतच्या संपूर्ण धोरणात्मक दृष्टीकोनाचं नेतृत्व ते करतात. ब्रँडिंग, फ्रँचायझी मॉडेल डिझाईन, मार्केट स्ट्रॅटेजी, प्रचार योजना, भागीदारी विकास आणि विस्तार मोहिमा यांचा समावेश त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये आहे.

🧑‍💻

प्रकल्प संचालक – नेटवर्किंग

प्रकल्प संचालक

"गावाचा विकास हवा असेल, तर गावातील माणसावर विश्वास ठेवायला हवा – आणि तो विश्वास तयार करणं, हे माझं काम आहे."

गावपातळीवर लोकांशी संवाद साधणे, स्थानिक विश्वास मिळवणे, जिल्हा आणि तालुकास्तरावर भागीदारी तयार करणे आणि सरकारी/सामाजिक प्रतिनिधींना या प्रकल्पाशी जोडणे – ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे.

👷

प्रकल्प संचालक – अंमलबजावणी

प्रकल्प संचालक

"प्रत्येक केंद्र हे केवळ नावासाठी नको – ते चालतंय, टिकतंय, आणि यश देतंय, हे मी पाहतो. कारण यश हे फक्त सुरू करण्यात नाही – ते टिकवण्यात असतं."

प्रकल्पाच्या ऑन-ग्राउंड अंमलबजावणी, फ्रँचायझी सेटअप प्रक्रिया आणि कार्यक्षमतेच्या नियंत्रणाचं प्रमुख नेतृत्व ते सांभाळतात. केंद्र कुठे उभे करायचे, कसे सुरू करायचे, किती वेळात पूर्ण करायचे – याची संपूर्ण यंत्रणा त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असते.

Loader GIF